बुद्धिबळपटूंचा पुढाकार रशियाला लढा देण्यासाठी

किव्ह -बुद्धिबळाचा प्रत्येक डाव हा युद्धासारखाच असतो, असे अमेरिकेचे दिवंगत बुद्धिबळपटू बॉबी फिशर म्हणायचे.युरोपातील महासत्ता रशिया आणि त्यांचे शेजारील राष्ट्र युक्रेन यांच्यातील संघर्ष जवळपास दोन आठवडय़ांनंतरही सुरूच आहे. दोन्ही देशांनी माघार घेण्याची तयारी दर्शवलेली नाही. रशियाने केलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना मोठय़ा जीवितहानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपल्या देशासाठी युक्रेनच्या सामान्य जनतेनेही शस्त्रे हातात घेतली असून त्यांच्या बुद्धिबळपटूंनीही रशियन सैन्याला लढा देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे सध्या चित्र आहे.

तसेच ५६ वर्षीय ग्रँडमास्टर जॉर्जी टिमोशेन्कोही युद्धात सहभागी झाला. ‘युरा (टिमोशेन्को) रायफल घेऊन राजधानीचे (किव्ह) रक्षण करण्यासाठी सज्ज आहे,’ असे त्याची मैत्रीण ज्युलियाने समाजमाध्यमांवर लिहिले. टिमोशेन्कोने काही वर्षांपूर्वी ओडिशा, गुजरात आणि भारताच्या अन्य काही शहरांत बुद्धिबळ शिबिरे घेतली होती. त्यामुळे युवा भारतीय बुद्धिबळपटूंच्या यशात टिमोशेन्कोचेही योगदान आहे.

 

माजी युरोपीय विजेती नतालिया झुकोव्हा ही ओदेसा शहरातील नागरिकांना साहाय्य करत आहे. त्याचप्रमाणे पावेल एलयानोव्ह आणि इगोर कोव्हालेन्को हे युक्रेनियन ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू पुढे येऊन लोकांची मदत करत आहेत.

बुद्धिबळाचा प्रत्येक डाव हा युद्धासारखाच असतो, असे अमेरिकेचे दिवंगत बुद्धिबळपटू बॉबी फिशर म्हणायचे. मात्र आता बुद्धिबळाच्या पटावर नाही, तर खऱ्या आयुष्यात युद्ध लढण्याची युक्रेनच्या बुद्धिबळपटूंवर वेळ आली आहे. ग्रँडमास्टर आणि युक्रेनच्या राष्ट्रीय बुद्धिबळ संघाचा कर्णधार ओलेक्झांडर सुल्यपाने हातात रायफल धरून लिव्ह शहरात रशियन सैन्याला लढा देण्यासाठी तयार असल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले. ‘शत्रूंपासून मी माझ्या देशाचे रक्षण करत आहे. सत्याचा विजय होईल याची मला खात्री आहे,’ असे त्या छायाचित्राखाली ओलेक्झांडरने लिहिले.

You might also like

Comments are closed.