शनिवारी (8 एप्रिल)आयपीएल मध्ये दोन सामने खेळविण्यात आले. दुसऱ्या सामन्यात मुंबई समोर चेन्नईचे आव्हान आहे या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मुंबईने 20 षटकात 157 धावा केल्या. ईशान किशन ने सर्वाधिक 32 तर टीम डेविड ने 31 धावांचे योगदान दिले. चेन्नई कडून डावखुरा स्पिनर रवींद्र जडेजा ने तीन गडी बाद केले. तर देशपांडे आणि सेन्टेनर यांनी प्रत्येकी दोन गडी बात करून त्याला चांगली साथ दिली.
धावांचा पाठलाग करीत असताना कोण्वे शून्यवर बाद झाला. अजिंक्य रहाणे ने मुंबईच्या गोलंदाजाचा भरपूर समाचार घेत मात्र वीस चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
त्याने सर्वाधिक 61 तर चांगल्या फॉर्मात असलेल्या ऋतुराज ने 40 धावा केल्या. दुबे आणि रायडूनही प्रत्येकी 28 आणि 20 धावा करून संघाच्या विजयाला हातभार लावला. तर मुंबई कडून तीन गोलंदाजांनी प्रत्येकी एक एक गडी बाद केला. रवींद्र जडेजा या सामन्यात सामनावर ठरला.