आठवडाभराहून अधिक काळापासून सुरु असणाऱ्या युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनला मदतीचा ओघ सुरु झालाय. अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था या युद्धग्रस्त देशाला मदत करत असतानाच आता एका रशियन व्यक्तीनेही यासाठी पुढाकार घेतलाय. या रशियन व्यक्तीचं नाव आहे रोमन अब्रामोविच. आता ही व्यक्ती कोण आहे असं विचाराल तर जगप्रसिद्ध चेल्सी फुटबॉल क्लबचे मालक अशी या व्यक्तीची ओळख आहे. बुधवारी रोमन यांनी ‘फार कठीण’ निर्णय मी घेतला असून प्रिमियर लीग क्लब विकाण्याचं ठरवलंय, असं जाहीर केलं. रोमन यांनी पत्रक जारी करुन हा निर्णय जाहीर केला आहे.
हा प्रसिद्ध क्लब विकून येणारा सर्व पैसा युक्रेनमधील युद्धग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येईल. चॅम्पियन्स लीगमधील या क्लबच्या भागीदारांसाठी आपण या क्लब मधून बाहेर पडणं फार फायद्याचं राहिलं असं रोमन यांचं म्हणणं आहे. २००३ पासून या क्लबचे मुख्य मालक रोमन हे आहेत. रोमन यांनी चेल्सी क्लबची मालकी चॅरेटेबल ट्रस्टकडे देणार असल्याचं म्हटलंय. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रोमन यांनी हा निर्णय घेतलाय.
मागील महिन्यामध्ये रोमन यांनी आबूधाबीमधील क्लब वर्ल्डकप स्पर्धेमध्ये संघाचं समर्थन करण्यासाठी हजेरी लावली होती. तातडीने हा क्लब विकला जाणार नाहीय. नसून विक्रीची प्रक्रिया सुरु झालीय. मी या क्लबवर असणारं कर्ज फेडण्याची मागणी करत नाहीय. हा क्लब म्हणजे माझ्यासाठी केवळ उद्योग किंवा पैशाचं माध्यम नव्हतं तर खेळ आणि क्लबसाठी असणारं प्रेम मला महत्वाचं होतं. मी माझ्या टीमला एका चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यास सांगितलं आहे ज्या माध्यमातून विक्रीतून मिळेला पैसा दान म्हणून दिला जाईल. या ट्रस्टच्या माध्यमातून क्लब विक्रीतून आलेला पैसा युक्रेन युद्धातील पीडितांना मदत म्हणून दिला जाईल. यामध्ये तातडीने लागणाऱ्या निधीपासून दिर्घकालीन प्रकल्पांसाठीही निधी पुरवाला जाईल, असं रोमन म्हणालेत.