औरंगाबाद (प्रतिनिधी) -मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲड ॲग्रीकल्चर (मसिआ) आणि एएसआर इडस्ट्रीज यांच्या संयुक्तविद्यामाने २५ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान एएसआर-मसिआ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत ८ संघानी सहभाग घेतला असून शुक्रवारी (ता.२५) सकाळी आठ वाजता पहिला समाना पार पडला.
सिडको एन-२ येथील जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ही स्पर्धा झाली आहे. शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता एएसआर इंडस्ट्रीजचे संचालक श्रीधर नवघरे, मसिआचे अध्यक्ष नारायण पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. स्पर्धेत मे. सुपर्ब पॉलीपॅक, मे. सन्मान इंडस्ट्रीज, मे, चंद्रा इलेक्टिकल,ॲड. इलेक्ट्रॉनिक्स, मे रेऑन इल्युमिनेशन, मे विश्व समुद्धी इंडस्ट्रीज, मे. किर्दक ऑटोकॉम्प प्रा. ली.,दिग्विजय इंडस्ट्रीज यांच्या टीम स्पर्धेत आहेत. आठ संघासाठी ए आणि बी असे दोन ग्रुप करण्यात आले आहेत. रोज सकाळी आठ, अकरा, दुपारी दोन वाजता अशा तीन सामने होणार आहे.
पहिला समाना हा इंन्ड्रेस हाऊजर विरुद्ध किर्दक चार्जर्स (एमएसईबी) यांच्यात होणार आहे. दुसरा चंद्रा मिडिया विरुध्द विश्व समुध्दी डॉमीनेटर्स(आयटी) यांच्यात होईल. तर तिसरा सामना हा सन्मान स्मॅशर्स (एमआयडीसी) विरुद्ध दिग्वीजय मार्वल्स (जीएसटी) यांच्यात होणार आहे.
ट्रॉफीचे शानदार अनावरण झाले-
एएसआर-मसिआ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे मंगळवारी (ता.२२) चिकालठाणा येथील मसिआच्या कार्यालयात ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे मुख्य प्रायोजक एएसआर इंडस्ट्रीजचे संचालक श्रीधर नवघरे, मसिआचे अध्यक्ष नारायण पवार, माजी अध्यक्ष बालाजी शिंदे, भारत मोतिंगे, ज्ञानेश्वर राजाळे,सुनील किर्दक, किरण जगताप, कमलाकर पाटील, श्रीराम शिंदे, रोहित नाईकवाडे, राजेंद्र मगर, अजिंक्य पाथ्रीकर, चैतन्य जाधव, स्पर्धेचे आयोजक मंगेश नीटूरकर, संयोजक स्पोर्ट कमिटी मिसाआचे मनीष अग्रवाल, समन्वयक कमलाकर पाटील, राहूल घोगरे,अमित राजाळे, संदीप पाटील, राहूल मोगले, सुरेश खिल्लारे देखील उपस्थित होते.