स्टार क्रिकेटरही या गाण्यावर डान्स करत असून आपला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा प्रसिद्ध चित्रपट ‘पुष्पा: द राइज’ला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाव्यतिरिक्त, ‘श्रीवल्ली’ या गाण्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या गाण्यावर व्हिडिओ बनवले.
भारतीय फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने त्याच्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या तो श्रीवल्ली’ या गाण्यावर वेगळ्या अंदाजात डान्स करताना दिसत आहे. त्याने आपल्या डान्समध्ये क्रिकेटही सामील करून घेतले आहे. अश्विनने बॅट पकडत ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स केला. त्याने या बॅटने स्ट्रेट ड्राइव्ह फटका खेळत या गाण्याची हुक स्टेप केली आहे.
एकदा पाहाच! अश्विनचा डान्स-
https://www.instagram.com/reel/CZTdbj6IMsa/?utm_source=ig_web_copy_link
अश्विनपूर्वी रवींद्र जडेजा, सुरेश रैना, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डेव्हिड वॉर्नर आणि हार्दिक पंड्या हेसुद्धा पुष्पा चित्रपटाचे फॅन बनले आहेत.