दुबई-आयपीएलच्या नॉकआउट सुरुवात झाली आहे. यामध्ये आज एलिमिनेटर मध्ये आरसीबी समोर कोलकाता चे आवाहन होते. तर यामध्ये स्टार अष्टपैलू खेळाडू सुनील नारायण च्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर कोलकाता ने आरसीबी चा पराभव करून क्वलिफायर 2 मध्ये आपले स्थान निश्चित केले. तसेच पराभवासह आरसीबी स्पर्धेतून बाहेर झाली आहे. आता कोलकाता चा सामना क्वलिफायर 2 मध्ये दिल्ली होणार आहे या सामन्यातील विजेत्यांचा सामना अंतिम फेरीत चेन्नईची होणार आहे. चार महत्वाचे गडी बाद करून फलंदाजीत 26 धावांचे योगदान देणारा अष्टपैलू स्टार खेळाडू सुनील नारायण या सामन्यात सामनावीर ठरला.
नाणेफेक जिंकून बेंगलोर चा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याचा हा निर्णय अंगलट पडला. सुनील नारायण च्या भेदक मारा समोर आरसीबीचा एकही फलंदाज टिकला नाही. सुनील नारायण णे आघाडीचे चार फलंदाज बाद करून बंगलोरचे कंबरडे मोडले. बेंगलोर कडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 39 धावा केल्या. व पडीक्कलणे 21 धावांचे योगदान दिले. कोलकाता कडून सुनील नारायणने शटकात मात्र 120 धावा देऊन महत्वाचे चार गडी बाद केले. फर्ग्युसन ही दोन गडी बाद करून त्याला मोलाची साथ दिली.
धावांचा पाठलाग करीत असताना कोलकाताच्या सलामीवीरांनी संघाला सावध सुरुवात करून दिली. पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेलने दोन्ही सलामीवीरान तंबूत पाठवले. नितीश राणा ने ही 23 धावांचे योगदान दिले तसेच सुनील नारायण ने फलंदाजीत ही तीन सलग षटकारांच्या मदतीने जलद 26 धावा केल्या. सलामीवीर सलामीवीर शुभमन गील ने सर्वाधिक 29 व व्यंकटेश अय्यर ने 26 धावा केल्या. तर बेंगलोर कडून चहल सिराज व पटेलने प्रत्येकी दोन गडी बाद केले.