स्पोर्ट्स पॅनोरमा | विशेष प्रतिनिधी
टीम इंडियाचा वाघ अशी ओळख असलेला मोहम्मद शमी आता रणजी संघातूनही बाहेर झाला आहे. यापूर्वी त्याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघातूनही डच्चू देण्यात आला होता.
न्यूझीलंड दौऱ्यातून वगळण्यात आल्यानंतर त्याला आता थेट रणजी संघातूनही ‘आऊट’ करण्यात आले आहे. लागोपाठच्या या घडामोडींनंतर मोहम्मद शमीसोबत नेमकं काय घडलं आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
















