• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, October 11, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

सक्षम भन्साळीचा मानांकित खेळाडूवर खळबळजनक विजय

by pravin
November 25, 2021
in लॉंग टेनिस, स्पर्धा
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पुणे(प्रतिनिधी)- ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित सातव्या पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटल चॅम्पियनशिप सिरिज 2021 स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात चौथ्या मानांकित सक्षम भन्साळी याने अव्वल मानांकित अहान सारस्वतचा 6-2 असा सहज पराभव करून खळबळजनक निकालासह अंतिम फेरीत प्रवेश केला..

महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औंध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात तिसऱ्या मानांकित राम मगदूमने कडवी झुंज देत स्वर्णीम येवलेकरवर टायब्रेकमध्ये 7-6(8-6) असा विजय मिळवला. याच मुलींच्या गटात अव्वल मानांकित ध्रुवा माने हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत चौथ्या मानांकित श्रेया होनकनचे आव्हान 6-0 असे सहज मोडीत काढले. तर, शिबानी गुप्तेने माहिका रेगेचा टायब्रेकमध्ये 7-6(7-5) असा संघर्षापुर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली.

10 वर्षाखालील मुलांच्या गटात उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात आरिन कोटणीसने आदिनाथ कचरेचा 6-1 असा तर, तिसऱ्या मानांकित आरव मुळ्येने हर्ष परिहारचा 6-1असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित ओवी मारणेने पाचव्या मानांकित मायरा शेखचा 6-3 असा पराभव केला. अव्वल मानांकित स्वरा जावळेने सारा फेंगसेला 6-3 असे नमविले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:
12 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
सक्षम भन्साळी(4) वि.वि.अहान सारस्वत(1) 6-2;
राम मगदुम(3) वि.वि.स्वर्णीम येवलेकर 7-6(8-6).

12वर्षाखालील मुली:
ध्रुवा माने(1) वि.वि.श्रेया होनकन(4) 6-0;
शिबानी गुप्ते वि.वि.माहिका रेगे 7-6(7-5).

10वर्षाखालील मुले:
आरिन कोटणीस वि.वि.आदिनाथ कचरे 6-1;
आरव मुळ्ये(3) वि.वि.हर्ष परिहार 6-1.

10वर्षाखालील मुली:
स्वरा जावळे(1) वि.वि.सारा फेंगसे 6-3;
ओवी मारणे(2) वि.वि.मायरा शेख(5) 6-3.

Tags: #PMDTAखळबळजनक विजयमानांकित खेळाडूसक्षम भन्साळी
ShareTweetSend
Next Post

कविता नावंदे यांनी अहमदनगर नंतर औरंगाबादमध्ये केला अनेक कोटींचा घोटाळा?;घोटाळ्यात जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त हे ही सहभागी आहेत ?

ताज्या बातम्या

R Ashwin speaking about Team India bowling weakness

टीम इंडियाचा पराभव का होतोय? आर. अश्विनने उघड केली सर्वात मोठी चूक

sports-panorama logo

IUSF: विद्यापीठ स्तरावरील खेळांमध्ये बदलाची नवी आशा

Shreyas Iyer on India's defeat against West Indies in 2nd T20

रांचीमध्ये २४९ धावा करूनही भारताचा पराभव; कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितली गोलंदाजांची मोठी चूक

Arunachal Pradesh cricket team likely to pull out of Ranji Trophy match against Nagaland

रणजी करंडक 2026-27: अरुणाचल प्रदेशचा संघ नागालँडविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याच्या तयारीत

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.