कोल्हापूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन, शिवाजी विद्यापीठ डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूरमध्ये सुरु असलेल्यास्पर्धेतील विजेत्या संघांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या शुभहस्ते व आमदार चंद्रकांत जाधव आणि जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थिती सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर पंच, मार्गदर्शक, राज्य पदाधिकारी यांचाही गौरव करण्यात आला.
या स्पर्धेतून निवडलेला २४ जणांचा संघ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी निवडलेला महाराष्ट्र संघ पुढीलप्रमाणे – फॉईल पुरुष -शाकेर सय्यद (औरंगाबाद) अनिल मठपती (कोल्हापूर), शीव यादव (पालघर) तेजस पाटील (औरंगाबाद), फॉईल महिला वैदेही लोहिया(औरंगाबाद), वैभवी इंगळे (मुंबई), खुशी दुखंडे (मुंबई उपनगर), अनुजा लाड (पालघर), ईपी पुरुष-प्रथमकुमार शिंदे(कोल्हापूर), गिरीश जकाते(सांगली), निखील कोहाड(भंडारा), मोरेश्वर पाटील(सांगली), ईपी महिला- माही आरदवाड (लातूर), नम्रता यादव(पालघर), ज्ञानेश्वरी शिंदे(लातूर), वामा मनियार(पालघर), सायबर पुरुष सुवर्ण अभय शिंदे (औरंगाबाद), प्रतिक जाधव(कोल्हापूर), श्रीशैल शिंदे (कोल्हापूर), पार्थ जाधव (कोल्हापूर), सायबर मुली- कशिश भराड (औरंगाबाद), श्रुती जोशी (नागपूर), अपुर्वा रसाळ (औरंगाबाद) माही आरदवाड (लातूर).
यावेळी डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र- कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा, रजिस्ट्रार विश्वनाथ भोसले, डी.वाय.पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक ए के गुप्ता, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, डी. वाय. पाटील पोलीटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, शिवराज महविद्यालय गडहिंग्लजचे संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे,. महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सल्लागार अशोक दुधारे, कार्याध्यक्ष प्रकाश काटोळे, सचिव उदय डोंगरे, खजिनदार राजकुमार सोमवंशी, स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष संजय जाधव, कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशनचे सचिव, विनय जाधव, डॉ. राजेंद्र रायकर, डॉ. बाबासाहेब उलपे, डॉ. राम पोवार, गजानन बेडेकर, राहुल मगदूम, प्रफुल्ल धुमाळ, संदीप जाधव, संभाजी मिरजे, दीपक क्षीरसागर यांच्यासह जिल्हा संघटनेचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.