औरंगाबाद- एम.एस.एम. बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन, औरंगाबाद, व औरंगाबाद जिल्हा हौशी 3 ऑन 3 बास्केटबॉल संघटना, औरंगाबाद, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, 3 ऑन 3 बास्केटबॉल पुरुष गटांच्या स्पर्धेचे आयोजन दिनांक 15 ते 17 सप्टेंबर 2021 तारखेदरम्यान मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या बास्केटबॉल मैदानावर करण्यात आले आहे.
स्पर्धा शासनाने कोविडबाबत ठरवून दिलेल्या सर्व नियम व अटींचे अनुपालन करून आयोजिली जात असून स्पर्धा प्रथम साखळी व त्यानंतर बाद पद्धतीने खेळविली जाणार आहे, व स्पर्धेत पुरुष गटातील वीसपेक्षा अधिक संघांचा समावेश सहभाग झाला आहे. स्पर्धेत आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त बास्केटबॉल खेळाडू विपुल कड(औरंगाबाद), आयुष्यमान (वाराणसी, उत्तरप्रदेश), साकलेन सय्यद(बीड), मिथुन दास(रायपुर, छत्तीसगड), अक्षय खरात (औरंगाबाद) व मराठवाडा विभागातील नांदेड, बीड, परभणी, पूर्णा, आदी ठिकाणचे बास्केटबॉल संघ सहभागी होणार आहेत.
तसेच स्पर्धेसाठी रोख रकमेचे प्रथम पारितोषिक रक्कम रुपये सात हजार व द्वितीय पारितोषिक रक्कम रुपये पाच हजार व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला रुपये एक हजार, उत्कृष्ट शूटरला रुपये एक हजार, उत्कृष्ट डिफेण्डर रुपये एक हजार या रोख रकमेची पारितोषिके व ट्रॉफीज प्रदान केली जाणार आहेत.तर स्पर्धेस प्रत्यक्षात सुरुवात सकाळी आठ वाजेपासूनच करण्यात येणार असून सर्व बास्केटबॉल प्रेमींनी संधीचा लाभ घ्यावा, असे अव्हान संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक गणेश कड यांनीं केले आहे.