‘अपयशानं खचून न जाता यशस्वी कसं व्हावं याचं मीरा आदर्श उदाहरण’: अजित पवार

मुंबई : भारताची महिला वेट लिफ्टर मीराबाई चानूने टोकियो आलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवत भारतासाठी पहिलं पदक पटकावलं आहे. तिच्या या कामगिरीमुळे देशभरातून तिच कौतुक होत आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनीही मीराबाई चानूचं कौतुक करत प्रतिक्रिया दिली आहे.
“2016 च्या रिओ ऑलिम्पिकमधल्या अपघाती अपयशावर मात करुन मीराबाई चानू यांनी यंदाच्या टोकियोमध्ये जिंकलेलं पदक हे अपयशानं खचून न जाता नव्या ऊर्जेनं जीवनात कसं यशस्वी व्हावं, याचं आदर्श उदाहरण आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
“टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात देशाला वेटलिफ्टिंगचं रौप्यपदक आणि पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचं मनःपूर्वक अभिनंदन! पहिल्याच दिवशी मिळालेलं यश भारतीय संघातील अन्य खेळाडूना उत्तम कामगिरी करून पदक जिंकण्यास प्रेरणा,विश्वास देईल,” असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Comments are closed.