साऊथचा बाहुबली हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला .याचा सिक्वेल देखील तितकाच हिट परफॉर्मन्स करून गेला. या चित्रपटात देवसेनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली.दरम्यान प्रभास आणि अनुष्काच्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येत होत्या मात्र दोघांनीही या बातम्या अफवा असल्याचे सांगितले.