ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष संघानं गौरवास्पद कामगिरी केली आहे. मात्र अभिनंदन करताना अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरनं कांस्य पदक जिंकणाऱ्या पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा न देता त्या महिला हॉकी संघाला दिल्या आहेत. त्यामुळे त्याला अनेकांनी ट्रोलही केले आहे.
फरहाननं आपल्या व्टिटमध्ये लिहिले होते की, ‘मुलींनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला टीम इंडियावर गर्व आहे. आपण चौथं पदक जिंकून देशाचं नाव मोठं केलं आहे. ही चांगली गोष्ट आहे.’ मात्र जेव्हा फरहानला आपली चूक लक्षात आली तेव्हा त्यानं ते व्टिट डिलिट केल्याचे दिसुन आले.
41 वर्षांनंतर भारतीय हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला आहे. त्यांनी बलाढ्य अशा जर्मनीला 5-4 असे हरवले आहे. त्यामुळे देशवासीयांनी त्यांचे कौतूक केले आहे. त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.